Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजेंची युतीसाठी साद  

धाराशिव/प्रतिनिधी ः राज्यातील बदललेले राजकीय गणित, आणि त्यानंतर विविध पक्षांकडून सुरु असलेली जुळवा-जुळवी सुरु असतांना, छत्रपती संभाजीराजे यांचा स

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा  
त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसखोरी प्रकरणी एसआयटी चौकशी
तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद

धाराशिव/प्रतिनिधी ः राज्यातील बदललेले राजकीय गणित, आणि त्यानंतर विविध पक्षांकडून सुरु असलेली जुळवा-जुळवी सुरु असतांना, छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य संघटना देखील आगामी निवडणुकीत मैदानात उतरणार आहे. युतीसाठी साद घालतांना संभाजीराजे म्हणाले की, ’स्वराज्य संघटना ही एक ब्रँड असून आम्ही पुढील निवडणुकामध्ये युती करावी यासाठी शिंदे-फडणवीस किंवा ठाकरे यांच्याकडे जाणार नाहीत त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे’, असे म्हणत संभाजीराजेंनी सर्वच पक्षांना खुली ऑफर दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये आज स्वराज्य संघटनेच्या 58 शाखेचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. स्वराज्य एक ब्रँड असून शिंदे फडणवीस किंवा ठाकरे यांना गरज असेल तर त्यांनी युतीसाठी आमच्याकडे यावे आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. समविचारी पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. आमची संघटना 2024 ला निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू, त्यामुळे भविष्यामध्ये सम विचारी पक्षाबरोबर युती करणार असल्याचेही संकेत छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट दिले. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते परंडा मतदार संघात स्वराज्य संघटनेच्या 58 शाखेचे आज उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात छत्रपती संभाजीराजे यांच्या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

COMMENTS