बीजींग : चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकि
बीजींग : चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानले फटकारले असून, पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार देत कठोर भूमिका घेतली आहे. या परिषदेतील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतील संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.
पाकिस्तानला फटकारतांना संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, काही देश सीमेपलिकडील दहशतवादाचा वापर धोरणात्मक साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात. अशा दुटप्पी निकषांना स्थान नसावे. अशा देशांवर टीका करण्यास शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनने मागेपुढे पाहू नये. जे लोक दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. तसेच आपल्या संकुचित आणि स्वार्थी हेतूसाठी दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. काही देश सीमेपलीकडून दहशतवादाला एक धोरण म्हणून वापरत आहेत. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. अशा दुटप्पी भूमिकेला कुठलेही स्थान असता कामा नये. तसेच एससीओने अशा देशांचा निषेध करण्यासाठी कुठलीही शंका बाळगता कामा नये. पहलगाम हल्ल्याचा थेट उल्लेख करताना राजनाथ सिंह यांनीयांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी, ’द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी गटाने निष्पाप पर्यटकांवर एक भयानक आणि घृणास्पद हल्ला केला, पीडितांना धार्मिक ओळखीच्या आधारे चिन्हीत केल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पहलगाम हल्ल्यात वापरलेले डावपेच हे लष्कर-ए-तोयबाने केलेल्या पूर्वीच्या हल्ल्यांशी जुळतात, यावरून वारंवार आणि ओळखता येणारा धोका अधोरेखित होतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

COMMENTS