Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस.जी.विद्यालयाचा साई शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

कोपरगाव शहर : नाशिक येथील बी.पी.पाटील जुनियर कॉलेज आणि एका माध्यमाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ए.पी.जे.अब्दुल कलाम शिष्यवृत्ती तालुका स्तरीय स्पर

न.पा. शाळेत जागतिक शिक्षक दिन साजरा
कारखान्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार
के.जे.सोमैया महाविद्यालयात विविध उपक्रम उत्साहात

कोपरगाव शहर : नाशिक येथील बी.पी.पाटील जुनियर कॉलेज आणि एका माध्यमाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ए.पी.जे.अब्दुल कलाम शिष्यवृत्ती तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा १४ डिसेंबर रोजी विद्यालयात  पार पडली. या परीक्षेत सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांमधून विद्यालयाचा साई नारायण कुलकर्णी हा तालुक्यात प्रथम आला असून त्याला ५१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी असणाऱ्या बीपी पाटील जुनिअर कॉलेज मध्ये आयोजित या स्पर्धेत अहिल्यानगर व नाशिक दोन्ही जिल्ह्यातून एकूण ५५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी हा द्वितीय आला असून त्याला १ लाख २१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत  ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, आनंद ठोळे, डॉ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे, माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप तुपसैंदर, मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभिम उल्हारे या सर्वांनी साई कुलकर्णीचे त्याचबरोबर त्याचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते साई व त्याचा पालकांचा सन्मान केला.

COMMENTS