Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण पोलीसांचे अंमली पदार्थ विरोधी अभियान 

१० गुन्हे दाखल, १४ आरोपींना अटक गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय विरोधी कारवाया आणखी तीव्र करणार

नाशिक प्रतिनिधी - दिनांक ०६ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले होते. नाशिक ग्रामीण घटकात पोलीसांन

पवनक्क्यांचे साहित्य चोरणारे नऊजणांना अटक
संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत डीजे दणाणला
अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापूरात आत्महत्या | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – दिनांक ०६ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले होते. नाशिक ग्रामीण घटकात पोलीसांनी अंमली पदार्थ शोधण्याकामी व्यापक मोहीम राबवली होती. सदर कालावधीत एकूण १० कारवाया झाल्या असून यात एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीतांकडून सुमारे १२ किलो गांजा व २३०५ अल्प्राझोलम गोळया असा एकूण १,६८,१३६ /- रू. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.. सदर कारवाया मालेगाव मधील पवारवाडी, किल्ला, मालेगाव शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तर नाशिक तालुका, चांदवड, सायखेडा, सिन्नर, सिन्नर एमआयडीसी व वावी या इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीतांविरुद्ध अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) या कायद्यखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या आरोपीतापैकी ०३ आरोपी अद्यापही पोलीस कोठडीत असून पोलीस त्यांचेकडे कसून तपास करत आहेत.

नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसाय विरुद्ध सुरू केलेले हे अभियान यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील. गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर, दिनांक १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलीस सर्वच अवैध व्यवसायाविरुद्धची आपली मोहीम आणखी तीव्र करणार आहेत.

नागरिकांना अवैध व्यवसायांविषयी काही माहिती असल्यास, त्यांनी ती नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हेल्पलाइन क्रमांक ६२६२ २५६३६३ यावर द्यावी व अवैध व्यवसायांच्या उच्चाटनासाठी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

COMMENTS