Homeताज्या बातम्यामनोरंजन

रुबिना दिलैकने दिली गुडन्यूज !

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री रुबिना दिलैक आणि पती अभिनव शुक्ल काही दिवसांपूर्वी एका मॅटर्निटी क्लिनीकबाहेर स्पॉट झाले होते. तेव्हापासून रुबिना

लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
जी च्या निर्णायक गोलने कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत
दार्जिलिंग रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री रुबिना दिलैक आणि पती अभिनव शुक्ल काही दिवसांपूर्वी एका मॅटर्निटी क्लिनीकबाहेर स्पॉट झाले होते. तेव्हापासून रुबिना गदोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पती अभिनवसोबत फोटो शेअर करत, अभिनेत्रीने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. अभिनेत्रीने पतीसोबत फोटो शेअर करत, चिमुकल्याच्या आगमनासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.अभिनेत्री रुबिनाने फोटो शेअर करताना सांगितले की,“आम्ही एकमेकांना वचन दिले होते, आम्ही ज्यावेळी एकमेकांना डेट करत होतो, त्यावेळीच एकमेकांना वचन दिले होते की, आपण एकत्रित जग एक्स्प्लोअर करु. गेल्या काही दिवसांपूर्वी लग्न केले, आता लवकरच आमचं एक छोटं कुटुंब तयार होणार आहे. चिमुकल्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.” शेअर केलेल्या फोटोमध्ये रुबिना आणि पती अभिनव एका यॉटवर उभे असलेले दिसून येत आहे

COMMENTS