Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड; कोळगावात महिला ग्रामसभेचा निर्णय

श्रीगोंदा : तालुक्यातील मौजे कोळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष महिला ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत महि

ट्रस्टच्या जागेवरील तारेचे कंपाऊंड तोडून ताबा मारणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी
डॉक्टरांनी सायकलवर केली पंढरपूर वारी
महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

श्रीगोंदा : तालुक्यातील मौजे कोळगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष महिला ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत महिलांनी गावात शिवीगाळ रोखण्यासाठी धाडसी निर्णय घेत ‘शिवी बंद’चा ठराव सर्वानुमते मंजूर केला. गावात कोणीही आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्यास त्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे सादर केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

दि. ८ मार्च रोजी आयोजित या महिला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अंगणवाडी सेविका शकुंतला देशमुख होत्या. अध्यक्षपदाची सूचना विद्या लगड यांनी मांडली, तर त्यास मीना भापकर यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेचा अजेंडा ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे यांनी वाचून दाखविला.

ग्रामसभेत शेती तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावाच्या स्वच्छतेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाने आपले घर, दुकान व परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा टाकल्याचे आढळल्यास त्याचा फोटो ग्रामपंचायत कार्यालयात सादर केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून १०० रुपयांचा दंड आकारण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना राबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला.

या वेळी सरपंच पुरुषोत्तम यशवंत लगड, उपसरपंच विलास बाळासाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लगड, सदस्य महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. शेवटी अध्यक्ष शकुंतला देशमुख यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याबद्दल ग्रामपंचायत व उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS