Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात क्षमता असूनही उद्योग पाठ फिरवत असल्याची सल मनात आहे, अशी टीका राष्ट्ववादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-

आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स
रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात क्षमता असूनही उद्योग पाठ फिरवत असल्याची सल मनात आहे, अशी टीका राष्ट्ववादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. ऋेुलेपप कंपनीच्या प्रकल्पाचे तेलंगणामध्ये काल उद्घाटन झाले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला.
तेलंगणात 4100 कोटींची गुंतवणूक असलेल्या आणि सुमारे 25000 हून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणार्‍या ऋेुलेपप कंपनीच्या प्रकल्पाचं सोमवारी भूमिपूजन झालं. तेलंगणा सरकारने मार्चच्या पहिल्या आठवड्यात कंपनीसोबत एमओयू केला आणि 2 महिन्याच्या आत प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले, याला म्हणतात वेगवान सरकार. केवळ जाहिराती लावून गवगवा करून सरकार वेगवान होत नाही. तर त्यासाठी कामही करावं लागतं. तेलंगणा सरकारची दूरदृष्टी आणि तेथे असलेले उद्योग स्नेही वातावरण यामुळे प्रकल्पास गती देण्यास मदत झाली असं ऋेुलेपप कंपनीकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रात मात्र दुर्दैवाने तशी स्थिती राहिली नाही, अशी टीका रोहित पवार यांनी ट्वीटमधून केली आहे.
ऋेुलेपप प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर निशाणा साधला. मात्र तेलंगणातही ऋेुलेपप चा प्रकल्प होत आहे. इतक्या वेगाने तेथील सरकारने या प्रकल्पाची कार्यवाही पूर्ण केली. महाराष्ट्राला हा वेग जमला नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी ट्वीटमधून केली आहे.
गेल्या महिन्यातही आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला होता. सुमारे 2300 कोटी रुपयांचा प्रकल्प तामिळनाडू सरकारने खेचून नेला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्राबाबत अशा बातम्या दिसत नाही. आपलं राज्य मागे पडत असल्याचं दुःख होतंय, असा टोला आमदार रोहित पवार यांनी सरकारला लगावला होता.

COMMENTS