Homeताज्या बातम्यासंपादकीय

रोहनची आत्महत्या की संस्थात्मक खून ?

   एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव अद्यापही घेत नाही! कालच मुंबईच्य

कर्जाच्या ओझ्याखालील महाराष्ट्र !
मीरा बोरवणकरांच्या पुस्तक निमित्ताने! 
मनोज जरांगे पाटील : इव्हेंट मॅनेजमेंट की सत्ता संघर्ष ?

   एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव अद्यापही घेत नाही! कालच मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेज मधील तिसऱ्या वर्षाचा एमबीबीएस चा विद्यार्थी रोहन रामफेर प्रजापती या विद्यार्थ्याने त्याच्या  होस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती, प्रसारमाध्यमातूनच बाहेर आली. मात्र, या सोबतच प्रसार माध्यमांनी शैक्षणिक तणावामुळे आणि गरिबीमुळे या  विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं परस्पर ठोकताळेपणा लावून बातमी केलीय. वास्तविक, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो, ही काही वेगळी गोष्ट नाही. परंतु, तिसऱ्या वर्षाला एमबीबीएस चा तो विद्यार्थी प्रवेश करीपर्यंत तो त्या अभ्यासक्रमाला सरावलेला असतो. त्याचप्रमाणे जे पालक आपल्या पाल्याला वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवतात, ते आपला आर्थिक अडचणींचा भाग जरी असला तरी, मुलाच्या शिक्षणासाठी ते कमी करत नाहीत; हा महाराष्ट्रातला आणि भारतातला सर्वत्र असलेला अनुभव आहे. तरीही, विद्यार्थी जेव्हा उच्च  व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमध्ये जेव्हा आत्महत्येचे पाऊल उचलतात, तेव्हा निश्चितपणे त्या ठिकाणी असलेल्या व्यवस्थापन आणि प्राध्यापकांच्या एकूणच प्रवृत्तीची चौकशी व्हायला हवी. रोहन रामफेर प्रजापती हा ओबीसी प्रवर्गातला विद्यार्थी अत्यंत कुशाग्र बुद्धीचा. ज्याने अखिल भारतीय नीट परीक्षेमध्ये ३१५५ वा क्रमांक प्राप्त केलेला होता. शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश झालेला होता; हे लक्षात घेतलं तर अतिशय गुणवत्ता असलेला हा विद्यार्थी एकाएकी आत्महत्या कसा करू शकेल? याचा अर्थ संस्थात्मक आत्महत्यांचा जो प्रकार भारतामध्ये घडतो आहे, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. प्रामुख्याने एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये गोवल जातं. रोहन प्रजापती हा साधा प्रजापती  समाजाचा मुलगा.  तो अतिशय गुणवत्ताशाली असा विद्यार्थी असताना, त्याची आत्महत्या म्हणजे हा संस्थात्मक खून आहे, असं म्हणण्यावाचून पर्याय राहत नाही. कारण, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी प्राध्यापक आणि व्यवस्थापन वर्तन करत, ते पाहता त्याचा समग्र सर्व्हे आणि अध्ययन करण्यासाठी एक समिती नेमायला हवी. जी समिती एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या मधल्या सामाजिक तज्ञांची आणि विचारवंतांची असायला हवी. या संस्थात्मक आत्महत्या नेमक्या का घडत आहेत, अशा प्रकारे ज्या आत्महत्या घडतात त्या एक प्रकारे खून आहेत. यापूर्वी अखिल भारतीय पातळीवर रोहित विमुला याची आत्महत्या देशभरात आंदोलनाचा विषय ठरली. परंतु, या आत्महत्येला सगळ्यांनी संस्थात्मक खून म्हटले होते. त्यामुळे, रोहन प्रजापती याची ही आत्महत्या केवळ आत्महत्या नसून हा संस्थात्मक खून आहे. कारण, उच्च व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील उच्च जातीय प्राध्यापक हे विद्यार्थ्यांशी वर्तन करताना सामाजिक ताण-तणाव कसा निर्माण होईल; त्या विद्यार्थ्यांचा अपमान कसा होईल किंवा त्या विद्यार्थ्यांना चारचौघांसमोर अपमाणित करण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय, त्याचा हा अविभाज्य परिणाम असतो. त्यामुळे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये घडणाऱ्या आत्महत्या या आत्महत्या नसून, ते संस्थात्मक खून आहेत. हीच बाब या प्रकरणातही दिसून येते. त्यामुळे, आम्ही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतो. याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. कारण ही केवळ आत्महत्या नाही. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण त्या तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याविषयी प्राध्यापक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन यांचा दृष्टिकोन काय होता हे स्पष्ट होईल. यापूर्वी, डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येतून सुध्दा त्यांचा कसा छळ केला गेला होता, हे स्पष्ट झाले होते. रोहन प्रजापती याने आत्महत्या का केली यावर सखोल चौकशी समिती नेमावी, अशी आम्ही मागणी करतो.

COMMENTS