Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरीरसौष्ठव स्पर्धेत रॉबी मैथीई, सुनंदा साळुंखे यांनी पटकावले पारितोषिक

शिर्डी प्रतिनिधी - येथे  इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीने  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुषांमध्ये मणिपूर य

संगमनेरात  थोरात सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामांची सांगता
चंद्रपूर दारूबंदी उठवल्याचा फेरविचार व्हावा ; व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच पुढाकाराने आजपासून राज्यव्यापी अभियान
विवेकबुद्धी जागरूक ठेवून सोशल मीडियाचा वापर करा -पोलीस अधीक्षक राकेश ओला

शिर्डी प्रतिनिधी – येथे  इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीने  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुषांमध्ये मणिपूर येथील सैनादलाचा रॉबी मैथीई  तर महिलांमध्ये महाराष्ट्राची सुनंदा साळुंखे या  खेळाडूंनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले रॉबिन मैथीई याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब पटकावून बाजी मारली. .त्याला आयोजकांकडून 1 लाख 51 आजाराचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
शिर्डी येथील पालखी निवारा येथे 29 व 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 325 खेळाडूंनी यात सहभाग घेतला. स्पर्धेचे कामकाज पाहण्यासाठी 125 पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन संत नवनाथ बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फाउंडेशनचे तसेच भारतीय आशियाई व आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे, स्पर्धेचे आयोजक तसेच उद्योजक संदीप सोनवणे, अँड प्रमोद जगताप, अँड ज्ञानेश्‍वर काळे, राष्ट्रीय संघटनेचे कोषाध्यक्ष राजेश सावंत, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनचे नंदू खानविलकर व आदी मान्यवर उपस्थित होते. शरीरसौष्ठव स्पर्धेत सेनादल व राज्यातील नामवंत खेळाडूंनी दमदार व पिळदार शरीरसौष्ठवचा थरार करत प्रेक्षकांची दाद मिळवली. शिर्डी परिसरात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरची शरीरसौष्ठव स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी या स्पर्धा बघण्याचा मनमुराद आनंद घेतला. 17 अन्य वजनी गटामध्ये प्रत्येकी 6 अनुक्रमे प्रमाणे 1510,7 ,5,3 हजाराचे रोख रकमेची बक्षिसे देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला एकूण 15 लाख रुपयांची रोख बक्षीस यावेळी देण्यात आले. या स्पर्धेसाठी आयोजकांकडून जवळपास 50 लाखांचा खर्च करण्यात आला. पुढील वर्षी देखील साईंच्या नगरीत 50 लाखांची रोख पारितोषिक स्पर्धकांना देण्यात येतील अशी घोषणा सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी यावेळी केली. या स्पर्धेत  55 ते 100 किलो वजन गटात सुकांता भोर लोकेश वसागाडेकर, नितीन बाननोत्रा, उमेश गुप्ता, उदय देवरे, टी. एस.सानेश, रोहित शीलन, हरमित सिंग, नितीन बाबू, गुरुप्रसाद शाहू, जितेंद्र नाईक, नामवंत सावंत, रेखा शिंदे, या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेसाठी मदन कडू, राजेंद्र सातपूरकर, सुनील शेंडगे, राजेश सावंत, नारायण पाडेकर, महेश गोसावी, बापू काळे ,संजय सुरवसे, मनोज गायकवाड, सोहल शेख आदी राज्य  व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS