दहेगाव बोलक्यात दरोडा, साडेतीन लाखांची जबरी चोरी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहेगाव बोलक्यात दरोडा, साडेतीन लाखांची जबरी चोरी.

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रहिवाशी भाऊसाहेब पंढरीनाथ इंगळे यांच्या घरी शुक्रवार दि ६ मे २०२२ रोजी पहाटे २  वाजून ३

पारनेर नगर पंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता
करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका
लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रहिवाशी भाऊसाहेब पंढरीनाथ इंगळे यांच्या घरी शुक्रवार दि ६ मे २०२२ रोजी पहाटे २  वाजून ३० मी च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सर्व गाढ झोपेत असताना घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत धारदार चाकूचा व एअरगनचा धाक दाखवून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केल्या असल्याची माहिती भाऊसाहेब इंगळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये देत पोलिसांनी  गुन्हा रजिस्टर नंबर १६८/२०२२ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सुरु केला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील दहेगाव बोलका येथील रहिवाशी भाऊसाहेब पंढरीनाथ इंगळे धंदा शेती हे आपल्या दहेगाव बोलका ते संवस्तर रेल्वे स्टेशन मार्गावरील वस्तीवर राहत होते शुक्रवार दि ६ मे २०२२ रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास २० ते २५ वर्ष वयोगटातील अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा  कडी-कोंडा तोडून  आत प्रवेश करत घरातल्यांना धारदार चाकू व एयरगण चा धाक दाखवून घरातील ७० हजार रुपये रोख रक्कम, ९६ हजार रुपयांच्या आठ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ४८ हजार रुपयाचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण त्यात  सोन्याच्या पळ्या व काळे मणी, १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, ३६०० रुपये किमतीच्या तीन ग्रॅम सोन्याच्या रिंगा, पेटीत व खिशात ठेवलेले ३ हजार रुपये रोख  तसेच ५ हजार रुपये किमतीची स्वामीराज सुखदेव बागल यांच्या घरातील एअरगण असे  एकूण ३ लाख ६५ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याने आसपासच्या परिसराती भीती पसरली आहे.

COMMENTS