कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा त्र

कोपरगाव आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
कळंबमध्ये डॉ. आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी
नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करून नागरिकांना होणारा त्रास थांबणार आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिल्या. 

कोपरगाव शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव रोड मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ९९ लक्ष ६० हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसमोरील उद्यान सुशोभीकरण करणे व ६८ लक्ष ९१ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद इमारत वॉल कंपाउंड करणे कामाचे भूमिपूजन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.  

ते म्हणाले की, कोपरगाव शहरात विविध ठिकाणी सुरु असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण करून हि कामे रेंगाळणार नाही याची काळजी कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व सबंधित ठेकेदाराने घेवून विकासकामे लवकरात पूर्ण करावी. कोपरगाव शहराच्या विकासासाठी माझ्याकडून निधीची कमतरता पडणार नाही. आलेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार व्हावी. विकासकामे सुरु असतांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हि विकास कामे रेंगाळणार नाही याची काळजी घेवून दिलेल्या मुदतीत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

           यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, जावेद शेख, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, प्रफुल्ल शिंगाडे, मंदार आढाव, बाळासाहेब साळुंके, राहुल देशपांडे, राजेश मारवा, उमेश धुमाळ, विजय त्रिभुवन आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

COMMENTS