Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहत्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

राहाता ः राष्ट्राचा सन्मान व प्रतिष्ठा समाजात निर्माण होण्यासाठी डॉक्टर हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. समूह शक्तीचे आधार

उसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने स्वतःला संपवले
संवत्सरचे सुनील भाकरे यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड
वाळू माफियांकडून तहसीलदारांंस शिवीगाळ व धमकी

राहाता ः राष्ट्राचा सन्मान व प्रतिष्ठा समाजात निर्माण होण्यासाठी डॉक्टर हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. समूह शक्तीचे आधार घेऊन साधना केली पाहिजे आपण स्वयंसेवक बनला ते कधी विसरू नका असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयं संघाचे नाशिक विभागाचे कार्यकारणी सदस्य कृष्णाजी घरोटे यांनी स्वयंसेवकांना केले.
   रा. स्व. संघ राहाता उपखंडाच्या वतीने विठ्ठला लॉन्स मध्ये विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गाने राहाता उपखंडातील स्वयंसेवकांनी घोष पथकास पथ संचलन केले.शहरातील नागरिकांनी यावेळी अनेक ठिकाणी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, पुरुष उपस्थित होते यावेळी स्वयंसेवकांनी योगा प्रात्यक्षिक, सूर्यनमस्कार,दंड प्रात्यक्षिक व सांघिक पद सादर केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते कृष्णाजी घरोटे, प्रमुख पाहुणे ध्यान साधिका श्रीमती सुनिताताई जैन व तालुका संघ चालक रावसाहेब मुरलीधर गोंदकर उपस्थित होते. कृष्णाजी घरोटे म्हणाले की, संघ स्थापनेपासून आज 98 वर्षे ही संघटना एक संघ राहिली ही हिंदूंसाठी फार मोठी शक्ती आहे या 98 वर्षाच्या प्रवासात निस्वार्थी स्वयंसेवक देशासाठी प्रामाणिक काम करणारी व सतत जीवनात देशभक्ती प्रकट करणारी शक्ती आहे. शक्ती म्हणजे संघ एक संस्कार आहे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये जी राष्ट्रभक्ती होती ती स्वयंसेवकांमध्ये असली पाहिजे असे त्यांनी सांगितले श्रीमती सुनिता जैन म्हणाल्या की, संघाच्या प्रत्येक स्वयंसेवक मध्ये राष्ट्रभक्ती दिसून येते आत्मज्ञान व आत्मशक्तीची तरुणांमध्ये गरज आहे.ध्यानामुळे अहंकार दूर होऊन क्रोध नष्ट होतो व शरीर व मन शुद्धी होते. प्रास्ताविक अजिंक्य वरवडकर यांनी केले यावेळी तालुका कार्यवाहक सदानंद ताम्हाणे,उपखंड प्रमुख ऋषी बाबर, प्रमुख शिक्षक अमोल गुरावे,डॉ स्वाधीन गाडेकर आदी सह उपखंडातील शंभर पेक्षा अधिक संघ स्वयंसेवक तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पुरुष उपस्थित होते.

COMMENTS