Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरआयटीच्या विद्यार्थ्यांच्याकडून एकाच दिवशी 30 पेटंट दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाने अभियंता दिनानिमित्त 30 भारतीय पेटंट दाख

निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी
एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यावर मोटसायकल रॅली
अरे ला कारे करत जाब विचारा : रुपालीताई चाकणकर

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागाने अभियंता दिनानिमित्त 30 भारतीय पेटंट दाखल करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा महत्त्वाचा टप्पा नवकल्पना, संशोधन आणि तांत्रिक प्रगतीसाठी विभागाच्या वचनबध्दतेवर प्रकाश टाकतो.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले म्हणाले की, ही कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आहे आणि संस्था अशा संशोधन कार्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन देईल.
पेटंटचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन आणि आयएसटीई आरआयटी स्टुडंट चॅप्टरच्या सहकार्याने, पेटंट प्रोटोटाईप प्रदर्शनाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे, इस्लामपूर येथे संपन्न झाला. या पेटंटमध्ये विविध क्षेत्रांतील तांत्रिक नवकल्पना समाविष्ट होत्या जसे की ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, कृत्रिम बुध्दिमता (ए आय ) आणि 10 टी, कृषी अभियांत्रिकी, ऊर्जा व्यवस्थापन आणि सस्टेनेबिलिटी, स्वयंचलित वाहतूक नियंत्रण प्रणाली, मेकॅट्रॉनिक सिस्टम्स आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांचा समावेश होता.
कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रसाद शिंदे, प्रा. जुबेर मुल्ला तसेच मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे प्रमुख डॉ. शैलेश शिरगुप्पीकर यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. मेकाट्रॉनिक्स विभाग अशा संशोधन कार्यासाठी सज्ज आहे. गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष भगतसिंग पाटील, सदस्य आ. जयंत पाटील, सचिव प्रा. आर. डी. सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामुळे विद्यार्थी आणि मेकाट्रॉनिक्स विभागाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS