Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजूर पोलिस स्टेशन वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक

अकोले ः राजूर पोलिस स्टेशन हद्दीत राम नवमी, हनुमान जयंती, व डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजुर पोलीस स

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी
कोपरगाव तालुक्यातील तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
संगमनेर तालुक्यातील जनतेच्या दबावावरून महसूल मंडळाची फेररचना

अकोले ः राजूर पोलिस स्टेशन हद्दीत राम नवमी, हनुमान जयंती, व डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजुर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाच्या खाली दंगा काबू प्रात्यक्षिक एस टी स्टँडवर राबवण्यात आले. राजूर पोलिस ठाणे सदर दंगा काबू प्रात्यक्षिक मध्ये 1अधिकारी,14 पोलीस अंमलदार, उपस्थित होते,कायदा व सुवस्थे बाबत पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी म्हणून तसेच आगामी काळात साजरे होणारे सण बाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये या साठी पोलीस सज्ज असावे याकरता मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजूर पोलीस स्टेशन वतीने दंगा काबू चे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजूर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा मिनिटात म्बुलन्स आली. नागरिकांना आम्ही पण आव्हान करतो की कायद्याचे उल्लंघन करू नये जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व पोलीस दलाला सहकार्य करावे असे आव्हान राजुर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केले.

COMMENTS