Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात उसळली दंगल

इंटरनेट सेवा बंद; जाळपोळीत दुकाने, घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

सातारा/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले असून महापुरुषांबाबत सोशल मीडियावर

आजचे राशीचक्र शनिवार,०४ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
नवे शिक्षण धोरण

सातारा/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले असून महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यावरुन हा वाद सुरू झाला होता. दरम्यान एका विशिष्ठ समुदायास या मुळे लक्ष्य करण्यात आले आहे. परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून प्रार्थना स्थळावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 10 जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक घरे आणि दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, पुसेसावली परिसरामध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची माहिती समोर आली असून, प्रार्थना स्थळावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात दोघांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान रात्री विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक झाली आहे. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. 2 ते 3 हजार युवकांचा जमाव जमा झाला होता. संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस मुख्यालयातून मोठा पोलिस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. सदर ठिकाणी तात्काळ पोलिस अधिकारी आणि अंमलदार स्टाफने दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली. 10 सप्टेंबर रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. सदर पोस्टवरुन रात्री उशीरा युवकांच्या मध्ये दंगल उसळली. या दंगलीत व जाळपोळीत 2 दुकाने आणि 2 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. प्रार्थना स्थळाची नासधूसही करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह 2 डीवायएसपी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होवून, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, तर याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

संचारबंदी लागू ;आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून गोंधळ – परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. जमावाने रस्त्यावर उतरत गोंधळ घातल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुसेसावळी येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून लोकांचा गैरसमज झाला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला होता.

COMMENTS