Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा परिसरातील रिंग रोडचे काम निकृष्ट

वनविभागाच्या टोलनाक्याजवळ रास्ता रोको करत आंदोलन

अकोले ः भंडारदरा परिसरातील रिंग रोडचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन

Ahmednagar : तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणी वाढल्या…. कर्मचारी आक्रमक l LokNews24
रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबधांतून ; बाळ बोठेसह इतर आरोपीविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
इन्कम टॅक्स भरणे, म्हणजे एक प्रकारची देश सेवाच

अकोले ः भंडारदरा परिसरातील रिंग रोडचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. वनविभागाच्या टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत आंदोलकांनी अधिकार्‍यांना याचा जाब विचारला. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात असणार्‍या  नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही  प्रशासनाने कोणतेही दखल घेतली नाही. शेवटी नाइलाजास्तव रतनवाडी व परिसरातील नागरिकांनी शनिवारी सकाळी भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ रास्ता रोकोचे आंदोलन केले.
रतनवाडी परिसरात सुरू असलेल्या रिंग रोडचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोपरतनवाडीच्या नागरिकांकडून केला जात आहे. भंडारदर्‍याला पावसाळा सुरू झाला तरीसुदधा अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. पावसात सदर रस्त्याचे काम करणारा ठेकेदार हा सिमेंटीकरण करत आहे. त्याचा परिणाम भंडारदराच्या पर्यटनावर होत आहे. रस्ता नसल्याकारणाने नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे.सिमेंटीकरण सुरू असल्याकारणाने अनेकदा हा रस्ता ठेकेदाराकडून बंद ठेवण्यात येतो, तर रतनवाडीची गत सहा महिन्यापासून एसटी महामंडळाची बस सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. यावरही रतनवाडीच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकदा एसटी महामंडळालाही या नागरिकांनी निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली. रतनवाडीत सुरू असलेले जलजीवन योजनेचे काम अतिशय निकृष्ट असल्याचे रतनवाडीच्या नागरिकांचे म्हणणे आहे. हे काम चांगल्या दर्जाचे करावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनाही ग्रामपंचायत कडून निवेदन देण्यात आले. अखेर काल रतनवाडी येथील दगडू पांढरे व इतर नागरिकांनी भंडारदरा धरणाच्या सांडव्यानजीक असणार्‍या वनविभागाच्या टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी नऊ वाजता रास्ता रोको केला. या रास्ता रोको आंदोलनामध्ये रतनवाडीचे माजी सरपंच दगडू पांढरे, संपत झडे, चंदर झडे, विजय भांगरे, माजी सभापती भरत घाणे, सुनील सारुक्ते, पांडुरंग खाडे, संतोष सोडणार, सोमनाथ झडे, भास्कर बुळे, ज्ञानेश्‍वर झडे, गंगाराम इदे, बुधापाटील इदे, विठ्ठल खाडे, पोपट खाडे, निवृत्ती बुळे, भाऊराव भांगरे, बाजीराव सगभोर व अनंत घाणे यांच्यासह अनेक आंदोलन सहभागी झाले होते. हे आंदोलन माजी आ. वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या आंदोलनाप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. रतनवाडी भागात जनतेचे प्रचंड हाल होत असून प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या रस्तारोकोच्या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दहिफळे व अकोले येथील पंचायत समितीचे जलजीवन योजनेचे अधिकारी सुनील साळुंखे यांना निवेदन देण्यात आली. दोन्ही अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्याकडे 10 जुलै पर्यंत मुदत मागितली असूनआंदोलनकर्त्यांनी 10 जुलै नंतर प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पो कॉ. विजय फटांगरे व इतर कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला

COMMENTS