अकोले : राजूर येथे आदिवासी विकास प्रकल्प यांच्या वतीने आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती राजूर प्रकल्प कार्यालयात येथे उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे होत्या. प्रथम क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून कार्यक्रम सुरुवात केली. राज्य सरकारच्या वतीने प्रथमच आदिवासी विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंबादास बागुल,प्रमोद राऊत, मनोज सोनवणे, प्रमोद शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुषार पवार, श्याम कांबळे, सुनील मोरे, अमोल जाधव संजय सुसलादे , शिंदे तसेच वस्तीगृहातील मुले मुली व कार्यालयीन सर्व कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन व प्रास्ताविक चौधरी आर आर यांनी केले तर आभार देवेंद्र शेंडे यांनी मानले. चंद्रपूरचे जिल्ह्याचे सुपुत्र वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी मोल्लंपल्ली (अहेरी) येथील श्रीमंत शेडमाके जमीनदारी येथे झाला. तर २१ ऑक्टोबर १८५८ रोजी शहीद झाले होते.

अकोले : राजूर येथे आदिवासी विकास प्रकल्प यांच्या वतीने आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती राजूर प्रकल्प कार्यालयात येथे उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे होत्या. प्रथम क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून कार्यक्रम सुरुवात केली. राज्य सरकारच्या वतीने प्रथमच आदिवासी विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंबादास बागुल,प्रमोद राऊत, मनोज सोनवणे, प्रमोद शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुषार पवार, श्याम कांबळे, सुनील मोरे, अमोल जाधव संजय सुसलादे , शिंदे तसेच वस्तीगृहातील मुले मुली व कार्यालयीन सर्व कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन व प्रास्ताविक चौधरी आर आर यांनी केले तर आभार देवेंद्र शेंडे यांनी मानले. चंद्रपूरचे जिल्ह्याचे सुपुत्र वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म १२ मार्च १८३३ रोजी मोल्लंपल्ली (अहेरी) येथील श्रीमंत शेडमाके जमीनदारी येथे झाला. तर २१ ऑक्टोबर १८५८ रोजी शहीद झाले होते.

COMMENTS