Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतिवाद्यांनी प्रतिक्रांती रोखायला हवी – डॉ.सागर जाधव

बीड प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे दोन क्रांती केल्या आहेत. पहिली धम्म तर दुसरी लोकशाही क्रांती केली. त्यामुळे आपण मुक्तपणे आणि न्याय

विमान आकाशात झेपावताच विमानातून निघाल्या ठिणग्या
शिवसेनेचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत – आ. रवी राणा 
उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला महिनाभरात मान्यता देणार

बीड प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इथे दोन क्रांती केल्या आहेत. पहिली धम्म तर दुसरी लोकशाही क्रांती केली. त्यामुळे आपण मुक्तपणे आणि न्यायिक जीवन जगतो आहोत. पण आता प्रतिकांती लोकांकडून पून्हा षडयंत्र आखले जात आहे. त्यामुळे वेळीच ही प्रतिकांती रोखायला हवी. असे मत महाकवी वामनदादा कर्डक  साहित्याचे अभ्यासक डॉ.सागर जाधव यांनी व्यक्त केले.  
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुधवार (दि.5) रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समस्त शोषितांच्या उत्थानाचा महामार्ग या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.सागर जाधव बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरसिंह ढाका तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दिनकर तेलप यांची उपस्थिती होती. उपस्थितांना संबोधित करताना डॉ.सागर जाधव म्हणाले की, या राष्ट्राला जातींनी खिळखिळी केलं आहे. प्रतिक्रांती लोकांना जीवन जगण्याची वैज्ञानिक पध्दती नको आहे. त्यामुळे विविध मार्गाने बहुजन वर्गाला पून्हा गूलामीत लोटण्याची रणनीती आखली जात आहे. संसदीय लोकशाही मान्य नसलेली लोक सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेली व्यवस्था निर्माण केली जात आहे. परिणामी क्रांतिवाद्यांनी वेळीच सावध राहू प्रतिकांतीचा हा डाव उधळून टाकला पाहिजे. सध्याचा काळ कठीण असून पून्हा केंद्र आणि राज्यात प्रतिक्रांतीवादी लोक जाऊन बसले तर बहुजनांचे वाटोळे झाले म्हणून समजा, त्यामुळे वेळीच सावध होऊन क्रांती घडवून आणावी.असे  परखड मत डॉ.सागर जाधव यांनी व्यक्त केले. या व्याख्यान मालेचे प्रास्ताविक प्रा.संजय कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन ड. सुरेश वडमारे, आभार प्रा.अशोक गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आज डॉ.गौतमीपुत्र कांबळेंचे व्याख्यान!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे आज शुक्रवार (दि.7) रोजी सायंकाळी 7 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान आणि सेक्युलेरिझम या विषयावर  विचारवंत डॉ.गौतमीपुत्र कांबळे आपले विचार  मांडणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

COMMENTS