Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रबोधनाशिवाय क्रांती होणे अशक्य ः अ‍ॅड. दिलीप काकडे

अहमदनगर येथे वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर ः जगातला कुठलाही समाजा प्रबोधनाशिवाय समृद्ध होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रबोधनाशिवाय कोणतीही क्रांती होऊ शकत नाही, त्यामुळेच प्रबोधनाला अ

बनावट दाखला देऊन लष्करात झाला भरती ; फसवणुकीचा गुन्हा दाखल
द्वारकादास मंत्री बँकेने घेतला मालमत्तेचा ताबा
बौद्ध संस्कार संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अहमदनगर ः जगातला कुठलाही समाजा प्रबोधनाशिवाय समृद्ध होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रबोधनाशिवाय कोणतीही क्रांती होऊ शकत नाही, त्यामुळेच प्रबोधनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. क्रांती ही प्रबोधनाच्या माध्यमातून प्रथमतःस्वतःच्या डोक्यात होत असते, त्यानंतरच ती प्रत्यक्षात येते, असे प्रतिपादन दि.धम्म संहिता अ‍ॅक्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक अ‍ॅड. दिलीप काकडे यांनी केले. ते अहमदनगर शहरातील चेतना लॉन्स येथे बौद्ध संस्कार संघ अहमदनगर यांच्या वतीने आयोजित वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अहमदनगर महानगरपालिकाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, पाणीपुरवठा अधिकार परिमल निकम, संजीव कालेलकर, कशलकुमार जयभीम जंगलबाग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अ‍ॅड. काकडे म्हणाले की, धर्मचक्र हा एक शब्द असून, प्रवर्तन हा दुसरा शब्द आहे. तर अनुवर्तन हा तिसरा शब्द असून, अनुप्रवर्तन हा चौथा शब्द आहे. या शब्दांचे भेद लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रवर्तन म्हणजे, ज्याने आधी स्थापना केली, निर्माण केले. त्यामुळे स्थापना अर्थात प्रर्वतन एकदाच होऊ शकते, आणि बुद्ध धर्मांची स्थापना गौतम बुद्धांनी केली असून, त्या धम्माचे आचरण करणे म्हणजे अनुप्रवर्तन होय. म्हणजेच बुद्धांच्या धम्मांचे आचरण जे उपासक-उपासिका करत आहेत. तर अनुवर्तन म्हणजे पुर्नःस्थापना करणे किंवा त्याला गतीमान करणे होय. तथागतांनी इसवीसन पूर्व 528 मध्ये बुद्ध धम्माची स्थापना केली, त्याच धम्माचे पुनःजीवन इसवीसन पूर्व 265 मध्ये सम्राट अशोकाने केली. त्यानंतर त्याच धम्माची पुर्नःस्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी केली. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन एकदाच होऊ शकते, असे प्रतिपादन अ‍ॅड. काकडे यांनी केले. यावेळी अ‍ॅड. दिलीप काकडे यांना बौद्ध संस्कार संघाच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब देठे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या कार्यक्रमाला बौद्ध संस्कार संघाचे सर्व सभासद पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS