Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक

सातारा / प्रतिनिधी : राज्य आपत्ती बचाव दल (एसडीआरएफ) कोयनानगर, ता. पाटण येथे स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देस

शेतकरी विरोधी कायदे मागे घेताना संसदेत चर्चा करायला हवी होती : ना. जयंत पाटील
अंनिसच्या अध्यक्षपदी सरोजाताई पाटील
लग्नपत्रिकेद्वारे अवयवदान जनजागृतीचा अनोखा उपक्रम

सातारा / प्रतिनिधी : राज्य आपत्ती बचाव दल (एसडीआरएफ) कोयनानगर, ता. पाटण येथे स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली.
बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक (एसआरपी) अभिषेक त्रिमुखे, समादेशक राज्य राखीव पोलीस दल संदिप दिवाण, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये खेळाचे मैदान, परेड ग्राऊंड, निवासी बांधकाम, प्रशासकीय इमारत यासाठी किती जागा लागणार आहे. याचा आराखडा तयार करा. अशा सूचना करुन या बैठकीमध्ये जागेची मागणी करण्यात आल्याचा तपशिल, जमिनीचे मुल्यांकन, सहाय्यक संचालक नगररचना यांचा अभिप्राय या विषयांवर चर्चा करण्यात आली.

COMMENTS