चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस

मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव फसला

पुणे प्रतिनिधी : एका दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार एका लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. ही घटना शन

कोरोनामुळे प्रवाशी वाहनांच्या निर्यातीत घट
प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
अवैध धंदे करणार्‍यांच्या मुसक्या आवळा, अन्यथा शहरात गँगवार होतील

पुणे प्रतिनिधी : एका दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्याचा प्रकार एका लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील लोको शेडजवळ घडली. लोणावळावरून पुणे स्टेशनकडे लोकल चालवत असताना त्यांना पुणे स्टेशनजवळ एका चिमुकलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सतर्क असलेल्या मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबून लोकल थांबवली. तेव्हा एकजण अंधारामध्ये या चिमुकल्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून पळून जात असल्याचं दिसलं. यावेळी मोहम्मद रफीक सुलेमानी यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी त्या मुलीला तिथेच सोडून पळून गेला. यावेळी प्रवाशांच्या मदतीने मुलीची सुटका केली गेली. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला होता. खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी भागात राहणारे मोहम्मद रफीक अमीर सुलेमानी (वय ५५ वर्षे) असं या मोटरमनचं नाव आहे.

COMMENTS