Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा मारहाणीत मृत्यू

पोलिस कर्मचार्‍याची हत्या? मारहाण प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा

देवळाली प्रवरा ः राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे आज दुपारच्या दरम्यान मायलेेकाने केलेल्या मारहाणीत एका 68 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्

आत्मा मालिकमध्ये सहा दिवस रंगणार चैत्र महोत्सव
स्वातंत्र्यसेनानी बा. ह. नाईकवाडी यांची जयंती उत्साहात
खा. लोखंडेंचा स्वीय सहायक दिशागतच ठरतोय विजयात अडथळा  

देवळाली प्रवरा ः राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे आज दुपारच्या दरम्यान मायलेेकाने केलेल्या मारहाणीत एका 68 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्‍याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.
        राहुरी शहरातील शनिशिंगणापूर फाटा येथे गुरूवारी 22 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गर्जे, वय 68 वर्ष, रा. अकोला जिल्हा अहमदनगर, या सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याला मारहाण करीत होते.महिले सोबत असलेल्या तरुणाने सुखदेव गर्जे यांना हेल्मेटने मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली. मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे हे खाली पडले आणि जागेवर गतप्राण झाले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारा पुर्वीच मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड,  प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदि पोलिस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घेतली पोलिस पथकाने ताबडतोब एक महिला व तीच्या सोबत असलेल्या तरुणास ताब्यात घेतले. वैभव विष्णू फुंदे, वय 24 वर्षे व सावित्री विष्णू फुंदे, रा. विद्यापीठ, मुळ रा. पाथर्डी, असे ताब्यात घेतलेल्या तरुण व महिलेचे नाव असल्याचे समजले. 15 दिवसां पूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सोन्याचे दागीने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. सदर घटना ताजी असतानाच आज मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला कि इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास राहुरी पोलिस पथकाकडून सुरु आहे. मात्र सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याची परिसरात चर्चा सुरु आहे.

COMMENTS