Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिजेएनटी मधील भामटा शब्द कायम ठेवा ; बंजारा समाजाच्या आमदारांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

यवतमाळ प्रतिनिधी - नाम साधर्म्याचा गैरवापर करून बोगस जात वैधता प्राप्त करणाऱ्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व्हिजेएनटी-अ मधील अ. क्र.३ वर

कुलरचा वापर करताना दक्ष रहा
सिंदखेड राजामध्ये सापडले शिवमंदिर
जम्मू-काश्मीरमध्ये दोन जवान गेले वाहून

यवतमाळ प्रतिनिधी – नाम साधर्म्याचा गैरवापर करून बोगस जात वैधता प्राप्त करणाऱ्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व्हिजेएनटी-अ मधील अ. क्र.३ वर नमुद भामटा शब्द कायम ठेवण्यात यावा अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भामटा हा शब्द हटवल्यास प्रगत असलेल्या जाती ह्या आरक्षण हडप करून अप्रगत व मागास असलेल्या भामटा व इतर मागास समाजावर व पर्यायाने विमुक्त जातीच्या आरक्षणावर अन्याय झाल्यासारखे होईल, असे नमुद केलेले आहे. वस्तुस्थितीचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी आमदार निलय नाईक ,मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनिल नाईक यांनी केली आहे.

COMMENTS