Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यापूर्वी सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा जनआंदोलन करू- शिवसेना  जिल्हा संपर्कप्रमुख  शिवाजी सावंत 

सोलापूर प्रतिनिधी - उजनी सोलापूर दुहेरी समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात झाला परंतु प्रत्यक्षात कामास मात्र सुरुवात झाली नाही.

बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार
नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी – उजनी सोलापूर दुहेरी समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात झाला परंतु प्रत्यक्षात कामास मात्र सुरुवात झाली नाही. या विरोधात शहरात अनेक संघटनांनी आंदोलन केले विधानसभा विधान परिषद येथेही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला यावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन दिले आहे.

दोन मक्तेदाराच्या वादामुळे सोलापूरचा पाणी प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे दोन मक्तेदारांच्या स्वार्थासाठी जलवाहिनीचे काम थांबू नका. राज्य शासनाने यावर तातडीने तोडगा काढून दुहेरी जलवाहिनीचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा सोलापूरकर रस्त्यावर उतरतील आणि आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा शिवाजी सावंत यांनी दिला.

COMMENTS