Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत भाजपमध्ये राजीनामासत्र

मुंबई ः नवी मुंबईत भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात

दोन मुलींना कंबरेला बांधून विवाहितेची आत्महत्या
अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांत मोबाइल द्या
कळंबी येथे विजेच्या तारा येतायत हाताला; शेतकर्‍यांचे जीव मुठीत घेऊन कामकाज; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई ः नवी मुंबईत भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली. नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. आमदार गणेश नाईक यांच्या समोर पदाधिकार्‍यांनी आक्रोश करत सर्वांनी एकत्र येत आपले राजीनामे दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे नवी मुंबईतील भाजप पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. भाजप पदाधिकार्‍यांना नरेश म्हस्केंची उमेदवारी मान्य नाही. संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश म्हस्केंना उमेदवारी का?, असा सवाल भाजप पदाधिकार्‍यांनी केला आहे. राजीनामा दिल्यानंतर हे पदाधिकारी मुंबईच्या दिशेला निघाले असून ते भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहेत.

COMMENTS