Homeताज्या बातम्यादेश

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा

नवी दिल्ली : दिल्लीतील ‘आम आदमी पार्टी’(आप) सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत

करंदीत विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर रॅलीने स्वागत
शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड
शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !

नवी दिल्ली : दिल्लीतील ‘आम आदमी पार्टी’(आप) सरकारमधील मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचेही राजीनामे स्वीकारले आहेत. राजीनामा दिलेले हे दोन्ही नेते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेला आव्हान देणार्‍या सिसोदिया यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिलाय. न्यायालयानं त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्लाही दिला. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सिसोदिया यांच्या वकिलाला म्हणाले की, तुम्ही हायकोर्टात जायला हवे होते, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जामीन का मागत आहात? ही चांगली बाब नाहीये. या निर्णयावर आम आदमी पार्टीने म्हटले की, ’आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो. आता जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.’केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. मनीष सिसोदिया यांच्याकडं दिल्ली सरकारमध्ये एकूण 33 पैकी 18 विभाग आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचे काम कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. केजरीवाल यांचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. जैन यांच्या विभागांचे कामही सिसोदिया पाहत होते.

COMMENTS