कोल्हापूरची रेश्मा व नाशिकचा हर्षवर्धन…कुस्तीचे गदाधारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरची रेश्मा व नाशिकचा हर्षवर्धन…कुस्तीचे गदाधारी

प्रतिस्पर्ध्यांवर केली गुणांनी मात, काँग्रेसच्या स्पर्धेचे जल्लोषात पारितोषिक वितरण

अहमदनगर/प्रतिनिधी : राष्ट्रीय कुस्तीपटू व कोल्हापूरची खेळाडू रेश्मा माने हिने सांगलीच्या प्रतीक्षा बागडे हिच्यावर अटीतटीच्या लढतीत 4 विरुद्ध 3 गुणांन

 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – सुभाष देशमुख
संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर

अहमदनगर/प्रतिनिधी : राष्ट्रीय कुस्तीपटू व कोल्हापूरची खेळाडू रेश्मा माने हिने सांगलीच्या प्रतीक्षा बागडे हिच्यावर अटीतटीच्या लढतीत 4 विरुद्ध 3 गुणांनी मात करीत शनिवारी मानाची चांदीची गदा व 1 लाखाचे बक्षीस जिंकले तर दुसरीकडे नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने कोल्हापूरच्या शुभम शिजनाळे याच्यावर 4 विरुद्ध 0 गुणांनी एकतर्फी विजय मिळवत 5 लाखाचे बक्षीस व अड़ीच किलोची चांदीची गदा पटकावली. नगरच्या वाडियापार्क मैदानावर शहर जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या कुस्ती स्पर्धेचे पारितोषिक वितरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उत्साहात झाले.
राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालिम संघ व शहर जिल्हा काँग्रेसच्या पुढाकाराने वाडियापार्क मैदानावर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेचा समारोप शनिवारी रात्री नऊ वाजता झाला. त्याआधी शेवटच्या दोन निकाली कुस्त्या रंगल्या. मात्र, चारही पहिलवान ताकदवान व राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध असल्याने त्यांच्यात चितपट कुस्ती झालीच नाही. गुणांच्या आधारे विजेतेपद निश्‍चित झाले. मुलींच्या 65 वयोगटाच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या रेश्मा माने व सांगलीची प्रतीक्षा बागडे यांची खडाखडी बराचवेळ रंगली. दोन्ही मल्लांनी 3-3 असे गुण घेतल्याने सामना बरोबरीत सुटतो की काय, असे कुस्तीप्रेमींना वाटत होते. पण अखेरच्या क्षणी रेश्माने एक गुण मिळवत विजेतेपद पटकावले. तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने अखेरपर्यंत कोल्हापूरच्या शुभम शिजनाळे याच्यावर वर्चस्व गाजवत 4-0 असा विजय मिळवला.

कुस्तीपटूंचा जल्लोष
शेवटच्या दोन्ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी झाली होती. चारही मल्लांना मैदानाभोवती उभ्या कुस्ती खेळाडू व प्रेमींकडून प्रोत्साहन दिले जात होते. या अंतिम लढतीतील विजेत्यांना त्यानंतर शौकिनांनी खांद्यावर उचलून घेत मैदानाला फेरी मारली, त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

COMMENTS