Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका

मराठवाड्यात जाणार्‍या बसेसची चाके थांबली

छ.संभाजीनगर : राज्यात मराठा आंदोलन आता तीव्र करण्यात आले आहे. जालना, छत्रपती सांभाजीनगर, नांदेड, नाशिक आदी ठिकाणी सरकार विरोधात निषेध मोर्चे आणि

 हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील – पोलिस आयुक्त
शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

छ.संभाजीनगर : राज्यात मराठा आंदोलन आता तीव्र करण्यात आले आहे. जालना, छत्रपती सांभाजीनगर, नांदेड, नाशिक आदी ठिकाणी सरकार विरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला देखील बसला आहे. राज्यातील परिस्थिती बघता रविवार पासून नांदेड आगारातील एसटीच्या सगळ्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. नांदेड डेपोची बस नागपूरला जात असतांना पैनगंगेच्या पुलावर काही आंदोलकांनी ही बस पेटवून दिली होती. तर काही ठिकाणी एसटीवर दगड फेक करण्यात आली होती. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बसच्या फेर्‍या बंड करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली. दरम्यान, एसटी वाहतूक बंद झाली असून यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी देखील नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ काही अज्ञात व्यक्तिंनी बस थांबवून पेटवली. रविवारी पुन्हा एक बसवर दगडफेक करण्यात आली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली असून यात बसचे नुकसान झाले होते. त्यामुळे पोलिसांनी आता बस वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील 9 आगारातील 547 बसेसची वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

COMMENTS