Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

बुलडाणा : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्

पिक विम्याचे पैसे मिळावे म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्याचा प्रयत्न
आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा : मुख्यमंत्री फडणवीस
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दोन मुलींना शोधण्यात यश

बुलडाणा : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 25 एप्रिल रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

COMMENTS