Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कत्तली साठी दाबून ठेवलेल्या दहा गोवंश जनावरांची सुटका

अहमदनगर : महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचे जिवंत कत्तल करण्याचे उद्देशान आणुन त्यांना निर्दयत

उपजिल्हा रुग्णालय व व्यापारी संकुल कामाची आमदार काळेंकडून पाहणी
आमदार असताना शेतकर्‍यांचे किती प्रश्‍न विधानसभेत मांडले
छत्रपती शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन

अहमदनगर : महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचे जिवंत कत्तल करण्याचे उद्देशान आणुन त्यांना निर्दयतेने डांबून ठेवून,अमानुषपणे वागवून, विना चारा व पाण्याचे ताब्यात ठेवले असल्याचे मिळून आल्याने पोलिसांनी गोवंश जनावरांसह एकास ताब्यात घेतले. ही कारवाई कोठला येथील बापुसाहब दर्गाचे पाठीमागे,असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये केली. या बाबतची माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कोठला परिसरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की शहेबाज तय्यब कुरेशी (रा. कोठला, अ.नगर) याने कोठला,येथील बापुसाहब दर्गाचे पाठीमागे, असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गोवश जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असताना गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने शेडमध्ये डांबून ठेवलेले आहे. आत्ता गेल्यास मिळुन येतील अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी कोठला येथील बापुसाहब दर्गाचे पाठीमागील बाजुस जाऊन खात्री करता त्या 6 ठिकाणी असलेल्या एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरे विना चारा पाण्याचे निर्दयतेने डांबून ठेवलेले दिसुन आले.त्या पत्र्याचे शेडमध्ये एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शहेबाज तय्यब कुरेशी (वय 19 वर्षे, रा.कोठला, अहमदनगर, मुळ रा. मठगल्ली, राहुरी, ता.राहुरी) असे असल्याचे सांगितले. त्याचे कडे शेड मधील असलेल्या गोवंश जनावराबाबत विचारपुस करता त्याने ती जनावरे ही कत्तल करण्यासाठी आणलेले असल्याचे सांगितले. पोलिसाना त्या ठिकाणी 30 हजार रुपये रुपये किमतीचे काळे, पांढरे व तांबडे रंगाचे गोवंश जातीचे एकूण 10 वासरे मिळुन आले .पोलिसांनी ती जनावरें आणि शहेबाज कुरेशी यास ताब्यात घेतले.

या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहेबाज कुरेशी याच्या विरुध्द महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ), 1, 9 व प्राण्यांना निर्दयतेने वागवीनेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS