Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमातील मतदार यादीवरील दावे-हरकतींचा अहवाल प्रसिद्ध

मुंबई, दि. ०४: भारत निवडणूक आयोगाने १ ते ४ ऑगस्ट या काळातील बिहार येथे झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR 2025) उपक्रम अंतर्गत मिळालेल्या दा

रामेश्‍वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू
बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात नागरी सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री फडणवीस
पिंप्री राजा येथे कन्या दिन उत्साहात ; मुलींच्या जन्माचे स्वागत करा : जिल्हाधिकारी स्वामी

मुंबई, दि. ०४: भारत निवडणूक आयोगाने १ ते ४ ऑगस्ट या काळातील बिहार येथे झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR 2025) उपक्रम अंतर्गत मिळालेल्या दावे-हरकतींचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीबाबत आलेल्या दावे-हरकतींत एकूण १,६०,८१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपकडून ५३,३३८, काँग्रेसकडून १७,५४९, बसपाकडून ७४, आम आदमी पक्षाकडून १, सीपीआय (एम) कडून ८९९ आणि नॅशनल पीपल्स पार्टीकडून ७ अर्ज आले.

राज्यस्तरीय पक्षांमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) कडून सर्वाधिक ४७,५०६ अर्ज, जनता दल (यू) कडून ३६,५५०, सीपीआय (एम-एल) (लिबरेशन) कडून १,४९६, लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) कडून १,२१०, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाकडून १,९१३ आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाकडून २७० अर्ज नोंदवले गेले.

याशिवाय, मतदारांकडून थेट सादर झालेल्या दावे-हरकतींची संख्या १,९२७ आहे, तर १८ वर्षे पूर्ण केलेल्या नव्या मतदारांकडून (फॉर्म ६ आणि घोषणा) १०,९७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. नियमांनुसार, हे सर्व अर्ज संबंधित ईआरओ/एईआरओ (ERO/AERO) यांच्याकडून सात दिवसांनंतर निकाली काढले जातील. तसेच, एसआयआर (SIR) आदेशांनुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीतील कोणतेही नाव योग्य तपासणी आणि संधी दिल्यानंतरच वगळता येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

COMMENTS