नवी दिल्ली प्रतिनिधी - रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना पुन्हा एकदा दणका दिला आहे. रेपो दरात पुन्हा एकदा 0.25% वाढ करण्यात आली आहे. RBI च्या चलनविष

नवी दिल्ली प्रतिनिधी – रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना पुन्हा एकदा दणका दिला आहे. रेपो दरात पुन्हा एकदा 0.25% वाढ करण्यात आली आहे. RBI च्या चलनविषयक धोरणातील बदलानुसार व्याजदरात 0.25% वाढ करण्यात आली आहे. यासोबतच रेपो दरातही 0.25% वाढ करण्यात आली आहे. आता रेपो रेट 6.25% वरून 6.50% झाला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या आव्हानांमुळे जगभरातील केंद्रीय बँकांना चलनविषयक धोरणाच्या पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने गेल्या वर्षी मे पासून रेपो दरात एकूण 2.25% वाढ केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे ही वाढ झाली. सन 2022 मध्ये सरकारने रेपो दरात सलग 5 वेळा वाढ केली आहे. शेवटची दरवाढ डिसेंबर 2022 मध्ये झाली होती.
COMMENTS