Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात : कोल्हे

कोपरगाव शहर :  विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिरद्वारे समाज हितासाठी शिक्षण संस्था, युवा संघटना आणि प्रशासन एकत्र येऊन काम करत असल्याचे सुंदर चित्र पाहून मन भरुन आले. अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते आणि सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात असे प्रतिपादन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका विवेक कोल्हे यांनी केले. तालुक्यातील शिंगणापूर गावात संजीवनी विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना मुख्यमंत्री समुद्र पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार व आरोग्य शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या.  या प्रसंगी सरपंच डॉ.विजय काळे, ज्येष्ठ नेते यादवराव संवत्सरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, उपसरपंच पती शाम संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर,सागर शिंदे, राजश्री काळे, अरविंद संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, भिमराव संवत्सरकर, सतीश निकम, सुनील शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे, मुख्याध्यापक खेमनर, प्रा.चैतन्य काळे, प्रा.गणेश फोपसे, प्रा.सुप्रिया भागवत यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, गावातील अंगणवाडी व आशा सेविका, आरोग्य सेवक, डॉ.सोनवणे, शिंगणापूर ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाच ते सहा फेब्रुवारी हे दोन दिवस शिंगणापूर गावात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत संजीवनी युवा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या  स्मणार्थ मोफत फिरता तसेच संजीवनी आयुर्वेदा हॉस्पिटल द्वारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. संजीवनीच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा थेट त्यांच्या दारी मिळत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संजीवनी प्रधासनाच्या आभार मानले.

आरोग्य दूत गव्हाणेंकडून महाविद्यालयास साहित्य भेट
यशासाठी कठोर परीश्रमाची ठेवा तयारी : डॉ. कोल्हे
आत्मविश्वास मनुष्यास सातासमुद्रापार नेऊ शकतो : काळे

कोपरगाव शहर :  विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिरद्वारे समाज हितासाठी शिक्षण संस्था, युवा संघटना आणि प्रशासन एकत्र येऊन काम करत असल्याचे सुंदर चित्र पाहून मन भरुन आले. अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जिवंत राहते आणि सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात असे प्रतिपादन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका विवेक कोल्हे यांनी केले. तालुक्यातील शिंगणापूर गावात संजीवनी विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना मुख्यमंत्री समुद्र पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार व आरोग्य शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या.

 या प्रसंगी सरपंच डॉ.विजय काळे, ज्येष्ठ नेते यादवराव संवत्सरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, उपसरपंच पती शाम संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर,सागर शिंदे, राजश्री काळे, अरविंद संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, भिमराव संवत्सरकर, सतीश निकम, सुनील शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे, मुख्याध्यापक खेमनर, प्रा.चैतन्य काळे, प्रा.गणेश फोपसे, प्रा.सुप्रिया भागवत यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, गावातील अंगणवाडी व आशा सेविका, आरोग्य सेवक, डॉ.सोनवणे, शिंगणापूर ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच ते सहा फेब्रुवारी हे दोन दिवस शिंगणापूर गावात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान अंतर्गत संजीवनी युवा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या  स्मणार्थ मोफत फिरता तसेच संजीवनी आयुर्वेदा हॉस्पिटल द्वारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले. संजीवनीच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा थेट त्यांच्या दारी मिळत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संजीवनी प्रधासनाच्या आभार मानले.

COMMENTS