रेणापूर प्रतिनिधी - रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 107 नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. छाननीत 98
रेणापूर प्रतिनिधी – रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 107 नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. छाननीत 98 अर्ज वैध ठरले 9 अर्ज अवैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कालावधीत 46 जणांनी माघार घेतल्याने 17 जागेसाठी 51 उमेदवार निवडणूक रिंगनात उभे असून हमालव तोलारी मतदार संघातील एक जागा बिनविरोध निघाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.डी. शिंदे यांनी दिली.
रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दि. 27 मार्च ते 3 एप्रिल 2023 कालावधी होता. या दरम्यानच्या कालावधीत 107 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्राची छाननी (दि 5 एप्रिल ) झाली. यावर कोणाचाही अक्षेप आला नाही व छाननीत 10 नामनिर्देशनपत्र अवैद्य ठरले. यापैकी 1 उमेदवारांने अपिलात गेल्याने त्यांचा 1 अर्ज वैध ठरला. यात 17 जागांसाठी 98 अर्ज वैध ठरले. नामनिर्देशन पत्र माघार घेण्याकरिता दि. 6 ते 20 एप्रिल असा कालावधी ठेवण्यात आला होता. या कालावधीत 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 17 संचालकांच्या निवडणूकीसाठी 51 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे या बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
COMMENTS