Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धार्मिक सोहळ्यांमुळे समाजातील सलोखा टिकतो : महंत मंडलिक महाराज

देवळाली प्रवरा : धार्मिक सोहळे हे केवळ पूजेअर्चेपुरते मर्यादित नसून, कौटुंबिक तसेच व्यतिगत जीवन समृद्ध करण्यासाठी आणि समाजात सलोखा, सद्भावना निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात, असे प्रतिपादन महंत ह.भ.प. उद्धव  महाराज मंडलिक यांनी केले. शिर्डीच्या साईबाबांनी दिलेला “सबका मालिक एक” हा संदेश प्रत्येक धर्मग्रंथांचा आणि वेदशास्त्रांचा सारांश असल्याचे सांगत महाराजांनी सर्वधर्मसमभावाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री साई प्रतिष्ठाण आयोजित श्री साई उत्सव तपपूर्ती सोहळा निमित्त पार पडलेल्या श्री साईसच्चरित् पारायण व कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात काल्याच्या कीर्तनाचे निरूपण करताना ते बोलत होते.  यावेळी महाराजांनी आपल्या प्रवचनातून सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात सुख, शांती व समाधान मिळवायचे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. अध्यात्म माणसाला योग्य दिशा देते, मनाला स्थैर्य देते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, असे त्यांनी नमूद केले.  देवळाली प्रवरा हे गाव धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात परिचित असून, संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि भक्ती चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले. या साई उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर काल्याच्या किर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. साईभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तीभावाने आणि उत्साहात पार पडला.

यात्रेदरम्यान हाणामारी; गाडी जाळली 
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड
टाकळिमियाँ ग्रामपंचायतीत ६९ लाखांचा आर्थिक अपहार?
filter: null; fileterIntensity: null; filterMask: null; captureOrientation: 0;
algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: 0;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 188.02737;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 41;

देवळाली प्रवरा : धार्मिक सोहळे हे केवळ पूजेअर्चेपुरते मर्यादित नसून, कौटुंबिक तसेच व्यतिगत जीवन समृद्ध करण्यासाठी आणि समाजात सलोखा, सद्भावना निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात, असे प्रतिपादन महंत ह.भ.प. उद्धव  महाराज मंडलिक यांनी केले.

शिर्डीच्या साईबाबांनी दिलेला “सबका मालिक एक” हा संदेश प्रत्येक धर्मग्रंथांचा आणि वेदशास्त्रांचा सारांश असल्याचे सांगत महाराजांनी सर्वधर्मसमभावाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री साई प्रतिष्ठाण आयोजित श्री साई उत्सव तपपूर्ती सोहळा निमित्त पार पडलेल्या श्री साईसच्चरित् पारायण व कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात काल्याच्या कीर्तनाचे निरूपण करताना ते बोलत होते.

 यावेळी महाराजांनी आपल्या प्रवचनातून सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात सुख, शांती व समाधान मिळवायचे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. अध्यात्म माणसाला योग्य दिशा देते, मनाला स्थैर्य देते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, असे त्यांनी नमूद केले.

 देवळाली प्रवरा हे गाव धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात परिचित असून, संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि भक्ती चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले. या साई उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर काल्याच्या किर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. साईभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तीभावाने आणि उत्साहात पार पडला.

COMMENTS