Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरेंना दिलासा

हायकोर्टाकडून गौरी भिडेंना 25 हजारांचा दंड

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गौरी भिडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोरोनाका

पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन
पाच रुपयांचा मास्क पंधराला, तर दीड हजाराचा पलंग साडेसात हजाराला
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गौरी भिडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोरोनाकाळात अनेक उद्योग डबघाईला आलेले असताना सामना वृत्तपत्राला साडेअकरा कोटी रुपयांचा नफा कसा काय झाला?, असा सवाल करत गौरी भिडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंना दिलासा देत कोर्टानं याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करत त्यांची ईडी-सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी भिडे यांनी केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टाच्या चकरा मारणार्‍या ठाकरे गटाला मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला होता. याबाबत गौरी भिडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहून हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

COMMENTS