Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यालयात राहण्याची अट शिथील करा…शिक्षकांचे उद्या नागपुरात धरणे

नगर जिल्ह्यातील शिक्षकही होणार सहभागी, शिक्षक भारतीचे नियोजन सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिक्षक व सर्व कर्मचार्‍यांची मुख्यालयात राहण्यासंदर्भातील अट शिथिल करण्यात यावी, या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी शिक्षकां

नगर अर्बन बँकेचे विलिनीकरण होणार की अवसायनात निघणार?
आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुरी
क्रिप्टोचा खेळ संपला, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा – कडलग

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिक्षक व सर्व कर्मचार्‍यांची मुख्यालयात राहण्यासंदर्भातील अट शिथिल करण्यात यावी, या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे उद्या गुरुवारी (22 डिसेंबर) नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले जाणार आहे. शिक्षक भारतीने या आंदोलनाचे नियोजन केले असल्याची माहिती राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्यावतीने 22 डिसेंबर रोजी नागपूरच्या यशवंत स्टेडियमध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भरतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिकचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सचिव गाडगे यांनी दिली. सर्व कर्मचार्‍यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांना मूळ दिनांकापासून वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात यावी, सर्व पदवीधर/विषय शिक्षकांना 4300 ग्रेड पे वेतनश्रेणी मिळावी,2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची 7 व्या वेतन आयोगात निर्माण झालेली वेतन त्रुटी दूर व्हावी., वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांना तात्काळ वेतनश्रेणी लागू करावी तसेच नव्याने पात्र झालेल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करावे,ऑनलाइन कामांसाठी तालुकास्तरावर/ केंद्र स्तरावर स्वतंत्र व्यवस्था विकसित करावी, मुख्याध्यापकांचा अशैक्षणिक कामाचा ताण कमी करावा, शिक्षक व सर्व कर्मचार्‍यांची मुख्यालयात राहण्यासंदर्भातील अट शिथिल करण्यात यावी, यासह शिक्षकांच्या इतर प्रलंबित विविध प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गाडगे यांनी सांगितले.

नागपूरच्या आंदोलनात नगर जिल्ह्यातूनही शिक्षक भारतीचे सदस्य शिक्षक सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील नियोजन राज्य सचिव गाडगे यांच्यासह अहमदनगर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रुपाली कुरूमकर आदींसह पदाधिकार्‍यांनी केले आहे.

COMMENTS