Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्याचाराचे आरोप करणारी महिलेचे दाऊदशी संबंध – खा. शेवाळे

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर थेट संसदेत आरोप केल्याने महाराष्ट्रात राजकीय वादंग

प्रीतिसुधाजी स्कूलचा संस्कार फेस्टीवल ठरतोय आदर्श
चालत्या ट्रेनमधून लोकांवर बेल्टने हिंसक हल्ला
९ फेब्रुवारीला होणार एंटरटेनमेंटची डिलिव्हरी 

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर थेट संसदेत आरोप केल्याने महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटलेले आहे. त्यानंतर मुंबईतील एका फॅशन डिझायनरचे राहुल शेवाळे यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राहुल शेवाळेंनी त्या महिलेचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातील गँगशी संबंध असल्याचं सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची एआयएमार्फत चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे शेवाळेंच्या आरोपांनी राज्यात नव्या वादाला तोंड फोडले आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलताना म्हणाले की, ज्या महिलेने माझ्यावर आरोप केले आहे, त्या महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला असून राशिद नावाचा पाकिस्तानी एजेंटही आहे. ती अनेक लोकांसोबत काम करते. त्यामुळे हे प्रकरण काही साधेसुधे नाही, हा आंतरराष्ट्रीय कट असून या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. आरोप करणारी महिला दोनदा पाकिस्तानला जाऊन आलेली आहे. तिचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. पाकिस्तानी एजेंटच्या मदतीने तिने बनावट अकाऊंट्स तयार केली होती. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून याची चौकशी झाल्यास आंतरराष्ट्रीय कट उघडकीस येईल, असेही खासदार शेवाळेंनी म्हटले आहे. ठाकरे परिवाराने माझा संसार वाचवला असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. परंतु त्या महिलेला ते स्वत: पाठिशी घालत आहेत. असे केल्याने कुणाचे लग्न वाचते का?, या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा, असे राष्ट्रवादीसह ठाकरे गटालाही वाटते. परंतु या महिलेची कौटुंबिक पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. तिचा भाऊ सध्या तुरुंगात आहे. पोलिस तिच्या घरी गेले तेव्हा ती महिला त्यांना सापडली नाही आणि मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना कशी काय सापडली?, असा सवाल करत खासदार राहुल शेवाळेंनी राष्ट्रवादीवरही आरोप केले आहेत.

COMMENTS