Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना नुकतीच जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर

12 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य
राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना नुकतीच जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेततही कपात करण्यात आली आहे. अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

COMMENTS