Homeताज्या बातम्या

साखर कारखान्यांकडून वीजबिले वसूल करा : ना. रामराजे निंबाळकर

फलटण / प्रतिनिधी : थकीत वीजबिलप्रकरणी महावितरणने शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार

दुचाकी मध्ये पेट्रोल भरताना दुचाकीने घेतला पेट.
काँगे्रस गळती रोखणार कशी ?
शेतकी तालुका संघाच्या संस्थापक सदस्यांना न्याय मिळवून देणार – देविदास पिंगळे 

फलटण / प्रतिनिधी : थकीत वीजबिलप्रकरणी महावितरणने शेतकर्‍यांची वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी शेतकरी ज्या कारखान्यांना ऊस घालतात. त्या कारखान्यांच्या माध्यमातून महावितरणने बिले वसूल करावीत, अशी सूचना करण्याबरोबर शेतकर्‍यांनीही कारखान्यांना तसे संमती पत्र देऊन सहकार्य करावे, असे आवाहन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. पंचायत समितीच्या सभागृहात रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी आ. दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, प्रतिभा धुमाळ, महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सातार्‍याचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, फलटणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर उपस्थित होते.
फलटण तालुक्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जर शेतकर्‍यांची वीज महावितरणने कट केली, तर त्यास आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपणास ऊस घालणार्‍या शेतकर्‍यांची वीजबिले कारखान्यांनी महावितरणला भरावीत. यासाठी शेतकर्‍यांची संमती आवश्यक असून, तालुक्यातील शेतकर्‍यांनी कारखान्याला तसे संमती पत्र देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना वीजबिल हे भरावेत लागणार आहेत. आगामी काळात कारखान्याच्या माध्यमातून वीजबिले भरली गेली, तर शेतकर्‍यांवर वीज कट करण्याचा प्रश्‍न उद्भवणार नाही. योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संमती द्यावी, असे संजीवराजे निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या समस्या सभागृहामध्ये मांडल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश रामराजे निंबाळकर यांनी संबंधितांना दिले.

COMMENTS