Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही – नाना पटोले 

नागपूर प्रतिनिधी - सत्यजीत तांबेंना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. तांबे पिता-पुत्रांवर योग्य कारवाई केली जाणार आहे. पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला होणार ?
कोरोना बाधितांना खुर्चीवरच लावला ऑक्सिजन! ; ऑक्सिजन बेडची टंचाई; वायसीएम रुग्णालयावर उपचारासाठी मोठा ताण
सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी वेतनापासून वंचित

नागपूर प्रतिनिधी – सत्यजीत तांबेंना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. तांबे पिता-पुत्रांवर योग्य कारवाई केली जाणार आहे. पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना आम्ही तिकीट दिली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरून पक्षासोबत फसवेगिरी केली आहे आणि मुलाला अपक्ष भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, मी भाजपचा पाठिंबा घेणार आहे. हा मोठा दगाफटका तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेससोबत केला आहे.  बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. भाजपचं भय दाखवुन घर तोडण्याच्या खेळी सुरु झाली आहे.  ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल, त्यादिवशी भाजपला दुसऱ्यांची घरे फोडण्याची दु:ख कळेल. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कुणाचाही अर्ज दाखल केला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाही. असे नाना पटोले म्हणाले.

COMMENTS