Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचे राज्यपालपद स्वीकारण्यास तयार

भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे वक्तव्य

भोपाळ/वृत्तसंस्था ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून मुक्त करण्याची विनंती

पीएमपीची आता कॅशलेस तिकीट सुविधा
विकासकामांची अंमलबजावणीसाठी वृक्षतोड ः आयुक्त शेखर सिंह
लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी चा फेलोशिप अवॉर्ड प्राप्त

भोपाळ/वृत्तसंस्था ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर केंद्र सरकार नवा राज्यपाल शोधात असतांना, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यानंतर माजी लोकसभा अध्यक्षा आणि भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी राज्यपालपदासाठी तयारी दर्शवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सुमित्रा महाजन यांनी देखील महाराष्ट्राचे राज्यपालपद स्वीकारण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीत बोलताना भाजपा नेत्या सुमित्रा महाजन म्हणाल्या की, देशातील तिसर्‍या सर्वात मोठ्या नंबरचे पद मी भूषवलेले आहे. त्यामुळे आता मनात कोणतीही इच्छा राहिलेली नाही. त्यासाठी माझ्यात ताकदही राहिलेली नाही. परंतु भाजपने पालक म्हणून पाठवले तर महाराष्ट्रात जाईल, पद म्हणून नाही. त्यामुळे पार्टीला सांगा आणि मला महाराष्ट्राचे पालक करा, असे वक्तव्य सुमित्रा महाजन यांनी केल्यामुळे आता त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी देखील सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता त्यांनी याबाबत स्वत: खुलासा केला आहे.

COMMENTS