Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत क्रांती संघटनेच्या आदोंलनाला यश; 107 शेतकर्‍यांची बिले ग्रीन पॉवरकडून जमा

औंध / वार्ताहर : गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स लि. या कारखान्याच्या थकीत ऊसबिलासाठी रयत क्रांती संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे 107 शेतकर्‍यांच्य

आरटीईतून मान्यताप्राप्त शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक : विनय गौडा
हृदय विकाराच्या धक्क्याने 23 वर्षाच्या पैलवानाचा कोल्हापूरात मृत्यू
विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणानी सज्ज रहावे : जितेंद्र डुडी

औंध / वार्ताहर : गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स लि. या कारखान्याच्या थकीत ऊसबिलासाठी रयत क्रांती संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे 107 शेतकर्‍यांच्या खात्यावर ऊस बिले जमा झाली आहेत. त्यामुळे संघटनेच्या लढ्याला यश मिळाले आहे, अशी माहिती खटाव तालुकाध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2024-25 हंगामाचे या कारखान्याकडे शेतकर्‍यांचे ऊसाचे थकित बील मिळावे यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 25 जून रोजी कारखानास्थळी धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कारखाना प्रशासनाने 1 जुलै रोजी पैसेजमा करतो, असे लेखी आश्‍वासन दिले होते, परंतू पैसे न जमा झाल्यामुळे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांना शेतकर्‍यांना बरोबर घेऊन 2 जुलै रोजी आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळी कारखाना प्रशासन अधिकारी मोरे यांनी फोनवरून संपर्क करून 107 शेतकर्‍यांचे पैसे बँकेत जमा केले आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष कुलकर्णी यांनी बँकेत फोन करून माहिती घेतली असता पैसे जमा झाले असल्याची खात्री पटल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
उर्वरित शेतकर्‍यांचे पैसे कधी जमा होणार याविषयी चर्चा झाल्यानंतर 9 जुलै रोजी जमा होईल, असे लेखी पत्र संघटनेला देण्यात आले. यावेळी रयत क्रांती पुसेसावळी गटाचे नेते सुहास पिसाळ, सौरभ चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लांवड व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS