Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी

पुणे ः शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतली घेत सवतासुभा निर्माण करण्याचा पव

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
कडवट शिवसैनिक हरपला
औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

पुणे ः शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतली घेत सवतासुभा निर्माण करण्याचा पवित्रा घेताला होता. पक्षाचा निर्णय नसतांना देखील लोकसभा निवडणूक लढवण्याचा तसेच पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानीची सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी ही घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलतांना स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर गत 3-4 वर्षांपासून पक्षाच्या एकाही आंदोलनाला आले नाहीत. उलट स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप केले. यामुळे यापुढे शेतकरी संघटना व तुपकर यांचा कोणताही संबंध नाही. रविकांत तुपकर स्वतःचा सुभा करत असताना आमचे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात कशाला हवे, असेही संघटनेने या प्रकरणी तुपकर यांना टोला पाटील यांनी यावेळी लगावला. रविकांत तुपकर यांनी नुकतीच पुण्यात एक बैठक घेतली. ही बैठक घेताना त्यांनी पक्ष प्रमुख राजू शेट्टी यांना विश्‍वासात घेतले नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून ते स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप करत आहेत. ही संघटना माझीच आहे अशाप्रकारे ते वागत आहेत. 26 सप्टेंबर 2019 रोजीच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. आमचा पक्ष नोंदणीकृत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कष्टाने उभारण्यात आलेला पक्ष आहे. त्युमळे राजू शेट्टी यांनी त्यांचे काय नुकसान केले? हे त्यांनी सांगावे. रविकांत तुपकर पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात आले नाही. ते शेतकर्‍यांसाठी लढतात ही चांगली गोष्ट आहे. पण आता शेतकरी संघटना आणि रवींद्र तुपकर यांचा संबंध संपलेला आहे. राज्यात 10 शेतकरी संघटना असून त्यात आणखी एका संघटनेची भर पडली एवढेच. तुपकर आतापर्यंत आमच्या खांद्याला खांदा लावून लढलेत. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली असे म्हणणार नाही. पण ते स्वतःचा सुभा करत असताना आमचे मंगळसूत्र त्यांचा गळ्यात कशासाठी पाहिजे, असे म्हणत जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानीशी असलेला संबंध संपल्याचे जाहीर केले आहे.

COMMENTS