Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवंदेत महावितरणने केला महिला दिन साजरा

कोपरगाव तालुका ः संसारीक जबाबदारीबरोबर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याची गणना

श्रीसंत गोरा कुंभार चरित्र समर्पितेचा आदर्श ः ह.भ.प.डॉ.शुभम महाराज
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी

कोपरगाव तालुका ः संसारीक जबाबदारीबरोबर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याची गणना करणे शक्य नाही, घराला घर पनापासून ते देशाच्या  संरक्षणापर्यंत जबाबदारी ही प्रत्येक महिला अतीशय छान पद्धतीने पार पाडत आहे, देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा सिंहांचा वाटा आहे.त्यांच्या या महान निःस्वार्थी कार्याचा सन्मानार्थ  जागतिक महिला दिनानिमित्त महावितरण रवंदा (कोपरगाव ग्रामीण उपविभाग) येथे महीला दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवंदा कक्ष अभियांता  योगेश सोनवणे हे होते, तर सुत्रसंचालन आणि प्रस्ताविक सिताराम खंडागळे यांनी केले, यावेळी महीला पदमिनीबाई गंगाराम करळे व शबाना तांबोळी या दोन्हीही महिलांचा शाल पुषपगुच्छ देऊन सत्कार सन्मान करून महीला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सुनील नागरे, संदीप पठारे,नितीन मुर्‍हे, किरण पैठणकर, श्रीनिवास कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS