Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी शुक्ला यांची पदावरून गच्छंती

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकार्‍यांच्

शासकीय योजनांचा जत्रा कार्यक्रम घरोघर पोहचवा
प्रसिद्ध अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण
काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होत. मात्र तरीही अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी अनेकांच्या प्रलंबित होत्या. त्यातच महाविकास आघाडीने पोलिस महासंचालकपदी असणार्‍या रश्मी शुक्ला यांची बदली न करण्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सोमवारी राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या बाबत आदेश दिले आहेत. तसेच मंगळवार 5 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलिस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.

COMMENTS