Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खंडाळ्यात आढळले दुर्मीळ वाघाटी रानमांजर

खंडाळा / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे नागरी वस्तीपासून जवळ असणार्‍या उसाच्या शेतात दुर्मीळ वाघाटी रानमांजरीची दोन पिल्ले सापडली. खं

 हिंगणघाट तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात 
शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
आकडे बहाद्दरांविरुध्द महावितरणची धडक मोहीम

खंडाळा / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे नागरी वस्तीपासून जवळ असणार्‍या उसाच्या शेतात दुर्मीळ वाघाटी रानमांजरीची दोन पिल्ले सापडली. खंडाळा वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून ही पिल्लेबाहेर काढली.
पारगांव येथे पारगांव-खंडाळा बसडेपोच्या मागील बाजूस श्रीकृष्ण यादव यांच्या उसाच्या शेतात तोडणीचे काम सुरू असताना मांजरांच्या पिल्लांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे कामगारांनी तोड थांबवून यादव यांना माहिती दिली. त्यानंतर यादव यांनी वन विभागाच्या प्रभारी वनक्षेत्रपाल अंकिता तरडे, सामाजिक वनीकरणचे महेश पाटील यांना ही माहिती दिली. यानंतर पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने या पिल्लांवर कॅमेराच्या साहाय्याने नजर ठेवली. वनपाल राहुल जगताप, वनरक्षक वसंत गवारी, प्रकाश शिंदे, सुनील राऊत यांनी रेस्क्यू टीमला सहकार्य केले.

COMMENTS