चंद्रपूर ः जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस

चंद्रपूर ः जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या 8 कार्यकर्त्यांवर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
COMMENTS