दिशा सालियानप्रकरणी राणे पिता-पुत्रांना समन्स

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिशा सालियानप्रकरणी राणे पिता-पुत्रांना समन्स

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी : भाजप खासदार नारायण राणे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला होता.या विधानावरुन राज

महाडमधील महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं | LOKNews24
अर्थव्यवस्थेचे भान !
रेकॉर्डब्रेक पावसाने पुणेकरांची उडवली दैना

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी : भाजप खासदार नारायण राणे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला होता.या विधानावरुन राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाले होते.खळबळ उडाली होती. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावले आहे.
दिशाच्या मृत्यूनंतर नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले होते. त्यामुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याबाबत त्यांनी दोन वेळा मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. 19 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले आहेत. 3 मार्च रोजी अर्थात गुरुवारी नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नारायण राणेंसोबतच नितेश राणे यांना देखील पोलिसांनी पाचारण केले असून 4 मार्च रोजी नितेश राणे यांना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार?, असे राणेंनी म्हटले होते.

COMMENTS