Homeताज्या बातम्यादेश

रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

फसव्या जाहिराती दिल्याप्रकरणी द्यावे लागणार उत्तर

नवी दिल्ली : पतंजलीच्या उत्पादनांसंदर्भात केलेल्या जाहिरातींमधील दिशाभूल करणार्‍या दाव्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा रामदेव बाबांना सु

देशातील कोळसा उत्पादनात 17.13 टक्के वाढ
उद्यापासून शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानीचे पंचनामे : आ.आशुतोष काळें
अर्थव्यवस्थेचे भान !

नवी दिल्ली : पतंजलीच्या उत्पादनांसंदर्भात केलेल्या जाहिरातींमधील दिशाभूल करणार्‍या दाव्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा रामदेव बाबांना सुनावले आहे. या प्रकरणात मंगळवारी बाबा रामदेव स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांनी दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली. यावेळी न्यायालयाने रामदेव बाबांनी या सर्व प्रकरणात सर्व गोष्टी गृहीत धरल्यावरून त्यांना परखड शब्दांत सुनावले. सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांना अवमान प्रकरणी उत्तर देण्याची आणखी एक संधी दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.
बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार दोघेही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. रामदेव यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला. अशा जाहिरातीबद्दल आम्ही माफी मागतो. न्यायालयापासून पळून जाण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. बाबा रामदेव स्वत: न्यायालयात आहेत. ते माफी मागत आहे. तुम्ही त्याची माफी रेकॉर्डवर घेऊ शकता, अशी विनंती वकिलांनी न्यायालयाला केली. दिशाभूल करणार्‍या जाहिरातीबाबत पतंजलीची बाजू मांडताना रामदेव बाबांचे वकील म्हणाले की, आमच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. म्हणूनच अशी जाहिरात निघाली. मात्र, न्यायमूर्ती अमानुल्ला आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती यावर विश्‍वास बसणे कठीण आहे, असे न्यायमूर्ती म्हणाले. तर, न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी केंद्र सरकारलाही फटकारले. केंद्र सरकारने याकडे डोळेझाक कशी केली याचे आश्‍चर्य वाटते, असे कोहली म्हणाल्या. दिशाभूल करणार्‍या जाहिराती मागे घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्येच पतंजलीला दिले होते. तसे न केल्यास कारवाई करू. पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातीवर 1 कोटी रुपयांचा दंड आकारला जाईल, असेही न्यायालयाने बजावले होते.

पंतजलीला एका आठवड्याची शेवटची मूदत – न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी त्यांनी रामदेव बाबांच्या बिनशर्त माफीवर भाष्य केले. हा फक्त शब्दांचा खेळ आहे. पतंजलीनं त्यांच्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसाठी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. आणि आता तुम्ही माफी मागताय? अशा शब्दांत न्यायालयानं रामदेव बाबांना खडसावले. दरम्यान, यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारवरही टिप्पणी केली. आम्हाला आश्‍चर्य वाटते की जेव्हा पतंजली बाजारात जाऊन कोविडवर अ‍ॅलोपथीमध्ये कोणताही उपचार नाही असा दावा करत होतं, तेव्हा केंद्र सरकार डोळे बंद करून गप्प बसलं होतं, असं न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात अपेक्षित मुद्द्यांचा समावेश असणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला एका आठवड्याची शेवटची मुदत दिली आहे.

COMMENTS